मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी – बारावीच्या परीक्षांची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे . त्या पार्श्वभुमीवर केंद्रसंचालक व परिरक्षकांची बैठक गुरूवारी ( ता . ६ ) सेंट जोसेफ हायस्कूल येथे सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी दिली .
दहावी – बारावीची परीक्षा कॉपीविरहित होण्यासाठी केंद्रसंचालक व परिरक्षकांची संयुक्त बैठक होणार आहे . दहावीच्या केंद्र संचालक व परिरक्षकांची बैठक सेंट जोसेफ हायस्कूल येथे गुरूवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे . बैठकीपुर्वी त्यांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे . त्यानंतर दुपारी तीन ते पाच या वेळेत बारावी परीक्षेच्या केंद्रसंचालक व परिरक्षकांची बैठक होणार आहे .
त्या बैठकीपुर्वी त्यांना परीक्षेच्या संबंधित साहित्याचे वाटप केले जाणार आहे . तरी या संयुक्त बैठकीसाठी केंद्रसंचालक व परिरक्षकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन वठारे यांनी केले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज