(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा)
साेलापूर मतदार पडताळणी मोहिमेत दिलेल्या आदेशांचे पालन न करणे, जबाबदारी टाळणे यामुळे निवडणूक कार्यालयांकडून मतदान केंद्र अधिकाऱ्यांबरोबरच आता तलाठी, मंडलाधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.
ज्या तलाठी, मंडलाधिकाऱ्यांचे मतदार पडताळणीचे १० टक्केपेक्षा कमी काम अशा सर्व तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश निवडणूक कार्यालयांकडून देण्यात आले आहेत. नोटिसीला उत्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी सांगितले.
३४ लाख ३४ हजार मतदारांपैकी ७ लाख ३० हजार मतदारांची पडताळणी करण्यात आली. वारंवार सूचना, आदेश देऊनही मतदार पडताळणीच्या कामांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
प्रांताधिकारी, तहसीलदारांनी आढावा घेऊनही बीएलओसह तलाठी, मंडलाधिकाऱ्यांनी मतदार पडताळणी मोहिमेकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे मतदारसंघनिहाय ज्या तलाठी, मंडलाधिकाऱ्यांचे १० टक्केपेक्षा कमी काम झाले आहे, त्यांना प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये एका मतदारसंघातील २० हून अधिक तलाठी तर चार ते पाच मंडलाधिकाऱ्यांचा समावेश आहे. नोटिसीला उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सर्वात कमी काम केलेल्या तलाठी व मंडलाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता निवडणूक कार्यालयांनी व्यक्त केली
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज