मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम करताना वीस वर्षीय युवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दु:खद घटना पंढरपूर तालुक्यात घडली. पंढरपूर तालुक्यात मुंढेवाडी गावात राहणार अमोल शिंदे हा ध्येयवेडा युवक होता. आपण पोलिस अधिकारी व्हायचे हे त्याचे स्वप्न होते.
त्यासाठी अमोलने पोलिस ट्रेनिंग ॲकॅडमी मध्ये ट्रेनिंग घेण्यास सुरवात केली होती. चार दिवसांपूर्वी तो गावी आला होता. पण त्याचा व्यायामाचा दिनक्रम त्याने गावीही चालू ठेवला. आज सकाळी तो रनिंग करण्यासाठी बाहेर पडला. रनिंग करीत तो गावापासून चार किलोमीटर जावून घराजवळ आला. त्याच वेळी त्यांच्या छातीत कळ आल्याने तो खाली बसला.
काही कळण्याच्या आतच काळाने घाला घातला आणि पोलिस अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगणारा अमोल हृदयविकाराच्या झटक्याने देवाघरी गेला.व्यायाम करताना तरुणांना हृदयविकाराचा झटका येणे ही पहिली घटना नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज