मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
खानापूर तालुक्यातील बोगुर गावानजीक बोगुर इटगी रोडवर शनिवारी (ता.8) सकाळीभीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जण ठार झाले आहेत तर तीसहून अधिकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत आधिक माहिती अशी, ऊस तोड करणारे कामगार ट्रॅकटरमधून इटगी गावनजीकच्या बाहेरील रस्त्यावरून येत होते. यावेळी चालकाचे ट्रॅकटरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅकटरची कठड्याला धडक बसून ट्रॅकर नदीत कोसळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. सर्व मयत ऊसतोड कामगार आहेत. या अपघाताने असेकांचे संसार उघड्यावर पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज