मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ग्लिसरीनद्वारे तंबाखूला विविध प्रकारचे सेंट लावून विक्री करणाऱ्या शिवानंद आळगुंडगी (रा. २५६ गाळा, रविवारपेठ, सोलापूर) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाला अक्कलकोट रोडवरील गांधी नगरात राहणारे रामचंद्र चिलवेरी यांच्या जागेत खोली भाड्याने घेऊन सुगंधी तंबाखू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न निरीक्षक दयानंद पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. खांडेकर, नाईक पृथ्वीराज फुटाणे, महेश शिंदे, भारत गायकवाड यांच्या मदतीने तेथे छापा मारला. आरोपी शिवानंद आळगुंडगी याने तेथे सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कारखाना थाटल्याचे दिसून आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज