मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते ,त्यात शिक्षण देणाऱ्या शिक्षक ,मुख्याध्यापक आणि संस्थाचालक , मालक हे विद्यार्थ्यांच्या नजरेत आदरणीय व्यक्ती असतात .शिक्षकांचेच कामे तत्त्वे त्यांनी दिलेले संस्कार हे विद्यार्थी आत्मसात करून पुढील वाटचाल करत असतात.परंतु सदर ट्रस्ट आणि संस्था चालकाकडून चुकीच्या पद्धतीने कामे केली जात असेल तर ते संस्कार विद्यार्थ्यांवर ही पडणार हे मात्र नक्की ?
पुणे हडपसर सय्यदनगर / गुलाम अलीनगर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संस्थेला पुणे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ने मोठा झटका दिला आहे. हकीकत अशी की सय्यद नगर येथील सदरील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट च्या शाळेत घरगुती विजेच्या मिटरचा वापर होत होता.
त्या विजेच्या मीटरचा वापर घरगुती ऐवजी कमर्शिअल प्रकारचा वापर होत असल्याची तक्रार सजग नागरिक टाईम्स च्या प्रतिनिधीने केल्यानंतर
सदरील संस्थेचा भांडाफोड झाला व महावितरणने चौकशी करून नोटीस बजावून संबंधित ट्रस्टच्या चेयरमेनला ४१ , ४०० ( एक्केचाळीस हजार चारशे) रुपये दंड भरण्यास सांगितले होते.भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार चूक मान्य करून सदरील एज्युकेशन ट्रस्टने (एक्केचाळीस हजार चारशे) रुपयाच्या दंडाची रक्कम शासकीय तिजोरीत जमा केली.तर त्याचे संचालक शफी यासीन सय्यद ( इनामदार) याच्या नावाने मुसाद्दिक कॉम्प्लेक्स येथील इमारतीत असलेल्या दुकानातील विद्युत मीटर मध्ये फेरफार केल्याचे महावितरणच्या निदर्शनास आणले,
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज