मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आजारास कंटाळून निराळे वस्ती , क्रांती तालीम जवळ राहणाऱ्या महिलेने गच्चीवर जावून स्वताःला पेटवून घेतल्याची घटना शनिवारी पहाटे सव्वा दोनच्या पूर्वी घडली . यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे .
सुगमा तुकाराम हजारे ( वय त्याचा ५८ ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे . सुगमा हजारे या बऱ्याच वर्षापासून आजाराने त्रस्त होत्या . या आजाराला कंटाळून त्यांनी शनिवार , दि . ८ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हजारे या राहत्या घराच्या टेरेसवर गेल्या .
टेरेसवर जावून काडीपैटी पेटवून स्वताःला पेटवून घेतले . साडीने पेट घेतल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या . पहाटे सव्वा दोनच्या सुमारास नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर पाणी टाकून उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले . पण , उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज