मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा पोलिसांनी येड्राव येथील दारू अडडयावर अचानक छापा मारून तेथून अवैध दारूसाठा जप्त केला आहे . येड्राव येथील मारुती मंदिराच्या बाजूला एक इसम अवैध दारू द विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक फौजदार एम . बी . जमादार , नो . पा . हरीदास सलगर , पो . ना . चदगोंडा धानगोंडे यांनी ख येथे अचानक धाड टाकली असता एका काटेरी झुडपात सदर इसम अ अवैध दारू विक्री करताना आढळून आला . पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पळून गेला .
त्याची आजूबाजूला चौकशी केली असता त्याचे नाव संभाजी शंकर काळे असल्याचे समजले . पोलिसांनी तेथून पंधरा देशी संत्रा दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून याप्रकरणी संभाजी काळेविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज