मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पुणे विभागीय उपसंचालक कार्यालयातील तत्कालीन शिक्षण संचालकाने शिपायामार्फत 26 हजार रुपयांची लाच स्विकारल्याचे निष्पन्ना झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने त्यांना सोमवारी अटक केली. दरम्यान, त्यांच्या शिपायास लाचलुचपत विभागाने यापुर्वीच अटक केली आहे.
प्रवीण अहिरे असे तत्कालीन शिक्षण उपसंचालकाचे, तर राजु पोपट खांदवे असे अटक केलेल्या शिपायाचे नाव आहे. खांदवे यास दोन महिन्यांपुर्वीच अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास आला आहे. तक्रारदार यांचे अतिरीक्त विषय मंजुरीचे काम प्रलंबित होते. त्यास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी खांदवे याने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
दरम्यान, त्याने कोणासाठी लाच स्विकारली, याची विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. त्यामध्ये अहिरे याने लाच स्विकारण्यास प्रोत्साहन दिले, तसेच बनावट शासकीय कागदपत्रे बनविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सोमवारी त्यास अटक करण्यात आली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज