मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दिल्ली विधानसभेत पुन्हा आम आदमी पक्षालाच बहुमत मिळेल , असे निष्कर्ष सर्वच एक्झिट पोलमधून आले असले , तरी भाजप आमचीच सत्ता येईल , असा दावा करीत असल्याने निकालाची उत्कंठा वाढली आहे.
आज मंगळवारच्या मतमोजणीने ही उत्कंठा संपेल. दिल्लीची सत्ता पंधरा वर्षे सांभाळणाऱ्या काँग्रेसला यंदा तरी भोपळा फोडता येईल का , याची चर्चा सुरू आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल . दुपारी १२ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल . गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा कमी मतदान झाल्याने सर्वच पक्षांत घालमेल आहे . बहुमत मिळण्याची खात्री असली , तरी एक्झिट पोलमध्ये जागांचा आकडा कमी दिसत असल्याने ‘ आप ‘ मध्येही अस्वस्थता आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज