मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ग्रामपंचायत स्तरावर बांधकाम परवाना देण्याचे कामे किचकट झाले आहे, नगररचना विभागाकडे हेलपाटे मारुनही हा प्रश्न मार्गी लागत नाही. म्हणूनच पंचायत समितीकडील शाखा अभियंत्यांच्या मान्यतेने बांधकाम परवाना देण्याचा निर्णय दोन दिवसात होईल,अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प हे शासकीय उदासिनतेमुळेच रखडले आहेत, त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आढावा घेवून कारवाई करावी, याप्रकरणी शासकीय यंत्रणाकडून सुरु असलेली दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दिला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, गावांचा सर्वांगिण व नियोजनपूर्वक विकास होणे आवश्यक आहे. रस्ते, गटर्स, पायाभूत सुविधा, बांधकाम, चोहोबाजुंनी रिकामी जागा सोडणे या गोष्टी आवश्यक आहे. मात्र या कामासाठीचा मूळ बांधकाम परवाना काढणेच लोकांना अडचणीचे झाले आहे.
पूर्वी हे अधिकार ग्रामसेवकांना होते. मात्र ते नंतर नगररचना विभागाला दिले, मात्र त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी यांची वाणवा आहे. प्रस्ताव अडकून पडतात. लोकांची हेळसांड होते. त्यामुळेच हा निर्णय बदलणार आहे.
ग्रामसेवकाकडून बांधकामचा प्रस्ताव आला तर शाखा अभियंत्याच्या शिफारशीने परवाना मिळणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज