मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोन्याचे दागिने घडविण्याचा बहाणा करुन चौघांनी शहरातील सराफी व्यावसायिकांकडून एक ते दिड किलो वजनाचे व लाखो रुपयांचे किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी पश्चिम बंगाल येथील दोन सख्ख्या भावांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ही घटना तीन जानेवारीला रविवार पेठेमध्ये घडली.
प्रसन्न जीत मंहतो व चिरंजीव जीत मंहतो ( दोघेही रा. रविवार पेठ, मुळ रा.पश्चिम बंगाल ) यांच्यासह चौघांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिनेश पावटेकर (रा. रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पावटेकर यांचे रविवार पेठेत सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे.
दोघेही सराफी व्यावसायिकांनी दिलेल्या लगडीचे दागिन्यांत रुपांतर करुन वेळेत घडविलेले दागिने देत होते. त्यामुळे सराफी व्यावसायिकांचा त्यांच्यावर विश्वास बसला होता. त्यानुसार, फिर्यादी यांनीही त्यांच्याकडे 270 ग्रॅम सोन्याची लगड त्यांना दिली. त्यानंतर अन्य सराफी व्यावसायिकांकडून घेतलेले सोने, असे एक ते दिड किलो सोने घेऊन त्यांनी पुण्यातुन पळ काढला
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज