मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर गावच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरवर मोहोळ पोलिसांनी कारवाई केली . टिपर व वाळू असा एकूण २१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . ही घटना १२ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ : ३० वा . दरम्यान घडली .
बुधवारी पहाटे पोलिसांना टाकळी सिकंदर येथे अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे समजले . त्यानुसार टाकळी सिकंदर चौकामध्ये पहाटे ५ : ३० वा . च्या दरम्यान सुस्ते गावाकडून टिपर ( एम . एच . ०५ ए . एम . १६५८ ) हा टाकळी सिकंदर येथे वाळू भरून येत असल्याचे पोलीस पथकाला टिपर विनापरवाना वाळू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले . त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून गेला .
याप्रकरणी टिपर मालक सूरजकुमार अटकळे ( रा . शेगाव दुमाला ता . पंढरपूर ) व चालक रणदिवे या दोघांवर वाळू चोरीचा व वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज