मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी साकत ( खु ) येथील दोघांविरुद्ध आंबी पोलीस ठाण्यात ११ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
साकत ( खु ) येथील दिनकर शिंदे व शालन बाबूराव शिंदे यांनी गायी , म्हशी तसेच दागिने खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे घेवून ये म्हणत दिनकर यांच्या पत्नी कविता यांचा २०१४ पासून अनेकवेळा शारीरिक व मानसिक छळ केला .
तसेच पैसे न आणण्याच्या कारणावरुन मारहाण केल्याची फिर्याद कविता यांनी दिली . यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज