मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
शाळेतील मुलीला घड्याळ का दिले ? तिचा अन् तुझा काय संबंध म्हणून निमगाव टें . शाळेत बोलावून रोहिदास सुरवसे , चरण शिंदे यांनी माझ्या मुलाला त्याच्या मित्रासमोर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अपमानित केले . त्यामुळेच माझा मुलगा मनोज जोतिराम दबडे ( वय १८ ) याने आत्महत्या केल्याची फिर्याद मृत युवकाचे वडील जोतिराम संपत दबडे ( वय ४३ , रा . ढवळस , वडाचीवाडी ) यांनी कुडुवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे . त्यावरून दोघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी , की गुरूवारी ढवळस वडाचीवाडी हद्दीत स्वतःच्या शेतात मनोज जोतिराम दबडे ( वय १८ ) या युवकाने फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या केली होती . तो निमगाव टें . येथील विठ्ठलराव शिंदे महाविद्यायल येथे बारावीत शिक्षण घेत होता .
१२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ . ३० च्या दरम्यान निमगाव टें . येथील जिल्हा परिषद मराठी शाळा येथे शिवराज कुंभार , अजित चट्टे , अविनाश पवार , अभिजित देवकर यांच्यासमोर रोहिदास सुरवसे , चरण शिंदे यांनी मारहाण करून अपमानित केल्याने व पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिल्यानेच माझ्या मुलाने आत्महत्या केली असल्याचे जबाबत म्हटले आहे . आत्महत्येस प्रवृत्त केल्याने रोहिदास सुरवसे , चरण शिंदे यांच्यावर कुर्ल्डवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज