mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खुशखबर:शेतकऱ्यांना मिळणार घामाचं दाम,राज्य सरकारने उचलले पाऊल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
खुशखबर:शेतकऱ्यांना मिळणार घामाचं दाम,राज्य सरकारने उचलले पाऊल

(मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा)-

शेतकऱ्याच्या पदरात घामाचे दाम पडावे, यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. शेतीमालाची जास्तीत जास्त निर्यात करून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरावर सुकाणू समिती, तर जिल्हास्तरावर क्‍लस्टर फॅसिलिटेशन सेल स्थापन केला आहे.

शेतीमालाची निर्यात वाढल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती नाही, हे लक्षात घेऊन केंद्राप्रमाणे राज्य सरकारने कृषी निर्यात धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार राज्यातील कृषीसंबंधी विभागांना निर्यात प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे. राज्यातील बंदरे, रेल्वे, रस्ते तसेच विमानतळांवरील निर्यात व्यवस्था, मालाची साठवणूक यंत्रणा, पॅकेजिंग, प्रयोगशाळा, यंत्रसामग्री, कुशल कामगारवर्ग व तज्ज्ञ व्यक्तींची साखळी निर्माण केली जाणार आहे.

या सर्वांमध्ये समन्वय साधून निर्यातवाढीवर भर दिला जाणार आहे. जिल्हास्तरावर शेतीसंबंधित घटकांसोबत चर्चा करून तसेच उपलब्ध साधनसंपत्तीचा अभ्यास करून निर्यातवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

अशी असेल राज्यस्तरावरील समिती

शेतीमाल निर्यातीसाठी राज्यस्तरावर ३२ सदस्यांची सुकाणू समिती स्थापन केली आहे, तर जिल्हास्तरावर १४ सदस्यांच्या क्‍लस्टर फॅसिलिटेशन सेलची स्थापना केली आहे. राज्यस्तरावरील समितीमध्ये राज्याचे मुख्य सचिव, विविध विभागांचे प्रधान सचिव, सरव्यवस्थापक, आयुक्त, संचालक, विविध शेतीमाल निर्यात करणाऱ्या संस्थांचा समावेश करण्यात आला आहे.

असा असेल जिल्हास्तरावरील सेल

जिल्हास्तरावरील समितीमध्ये जिल्हाधिकारी, कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक, जिल्हा उपनिबंधक, राष्ट्रीय संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ, विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, तसेच निर्यातदार, प्रगतशील शेतकरी, कृषी विषयातील तज्ज्ञ यांचा समावेश आहे. जिल्हा समितीने ज्या भागातून शेतीमाल निर्यात करणे शक्‍य आहे, त्यासंबंधी निर्णय राज्यस्तरीय समितीला कळवायचा आहे.

केंद्राचे निर्यात धोरण

१. शेतीमालाची निर्यात २०२२ पर्यंत सध्याच्या ३० अब्ज अमेरिकन डॉलरवरून ६० अब्ज डॉलरपर्यंत वाढविणे

२. शेतीमाल उत्पादनाच्या ठिकाणांमध्ये वैविध्य आणणे आणि मूल्यवर्धित निर्यातीला चालना देणे

३. कृषिमालाचा बाजारातील प्रवेश सोपा करणे आणि स्वच्छतेसंबंधी समस्या सोडविण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उपलब्ध करून देणे

४. जागतिक कृषिमाल निर्यातीतील भारताचा हिस्सा दुपटीने वाढविणे

५. परदेशी बाजारपेठेत शेतकऱ्यांना निर्यात संधी उपलब्ध करून देणे

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra Maza

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
आजपासुन बारावी परीक्षेचा प्रारंभ मंगळवेढ्यातून २ हजार ८३५ विद्यार्थी

आजपासुन बारावी परीक्षेचा प्रारंभ मंगळवेढ्यातून २ हजार ८३५ विद्यार्थी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 29, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळणार, भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार; ‘या’ तारखेपर्यंत असणार दिवसभर दर्शन उपलब्ध

June 29, 2025
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

June 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा