मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथील श्री विद्या विकास मंडळ संचालित, श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना आणि श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे व्यवस्थापन या विषयावरती महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमांक मिळवले प्रथम सांकेत मोरे,द्वितीय मोनाली पाटील आणि हर्षदा गवळी (विभागून),तृतीय अर्पिता लाड.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.औदुंबर जाधव यांनी केले .शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना पंढरपूर व मंगळवेढा यांच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आदर्श शिक्षक पुरस्कार राजकुमार धनवे, आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रा.डॉ.औदुंबर जाधव,आदर्श पत्रकार पुरस्कार समाधान फुगारे व मोहन माळी ,आदर्श डॉक्टर नितीन आसबे, आदर्श अंगणवाडी शिक्षिका वर्षा वेदपाठक आणि फॅशन डिझायनर दिपाली मके यांना हे पुरस्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफे.डॉ.एन.बी.पवार, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव नाना देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा संघटक मनोज चव्हाण, तालुका अध्यक्ष सुरज फुगारे, शहराध्यक्ष सागर वाघमारे, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अक्षय पवार, शहर उपाध्यक्ष जमीन आमदार, विजय माळी, हनुमंत घाडगे पाटील हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सरगर यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डॉ. महेश घाडगे आणि प्रा.राजकुमार पवार यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे आभार विभागीय जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे यांनी मानले.
याप्रसंगी नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याकडून विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल भूगोल विभाग प्रमुख प्रा.डी.एस. गायकवाड यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हिंदी विभाग प्रमुख नवनाथ जगताप,बार्शी तालुका अध्यक्ष धीरज शेळके ,बालाजी धनवे उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज