मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने,अनेकजण पैशांचे व्यवहार देखील ऑनलाईन करतात . मात्र यासोबतच ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे . हॅकर्स तुमची माहिती चोरून सहज तुमच्या खात्यातील रक्कम काढून घेतात.
अशाच काही पद्धतींविषयी जाणून घेऊया , ज्याद्वारे हॅकर्स तुमची माहिती सहज चोरतात व तुमचे आर्थिक नुकसान होते . स्मिशिंग – हॅकर्स या पद्धतीद्वारे ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना निशाणा बनवतात . हॅकर्स ग्राहकांना कॅशबॅक अथवा बंपर डिस्काउंटची ऑफर देतात .
यामुळे तुमच्या क्रेडिट – डेबिट कार्डची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते . या माहितीद्वारे हॅकर्स तुमचे खाते रिकामे करतात .
ज्यूस जॅकिंग – या पद्धतीद्वारे हॅकर्स सार्वजनिक चार्जिंग पोर्टवर फाइल अथवा कार्ड रिडर चीप लावतात . ही चीप चार्जिंग पोर्टवर लावलेल्या स्मार्टफोनमधील सर्व माहिती कॉपी करुन घेते आणि फोनमध्ये व्हायरस टाकते .
रिमोट असिस्टंट – यामध्ये हॅकर्स लोकांना क्विक स्पोर्ट आणि एनीडेस्क सारखे अॅप्स डाउनलोड करायला सांगतात . हे अॅप्स हॅकर्सला तुमच्या फोनचा संपुर्ण एक्सेस देतात . याद्वारे तुमची सर्व माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते व हॅकर्स तुमचा फोन कंट्रोल करतात .
फिशिंग – यामध्ये हॅकर्स लोकांना व्हायरस असणारे लिंक आणि एसएमएस पाठवतात . यावर क्लिक केल्यानंतर तुमची संपुर्ण माहिती हॅकर्सपर्यंत पोहचते . हॅकर्सला खाजगी माहिती दिल्याने , तुमच्या खात्यातून रक्कम काढली जाते .
ऑनलाईन व्यवहार – या पद्धतीमध्ये हॅकर्स ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन कॉल केल्याचा दावा करतातत . यानंतर ग्राहकांना रिफंडचे आमिष दाखवून खाजगी माहिती मिळवतात . माहिती मिळताच हॅकर्स काही मिनिटात खाते रिकामे करतात.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज