मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांचे गेल्या तीन महिन्यापासून चे वेतन थकीत असल्याने कामगारांच्या घरातील लहान मुलांचे व जेष्ठ नागरिकांचे सुध्दा उपासमारीनं होत आहे. नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन देशसेवा कामगार युनियन यांच्या माध्यमातून. सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्तानी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्या १. स्वच्छता कामगारांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकित आहेत त्वरित अदा करावेत यामध्ये जाणून-बुजून नगराध्यक्ष टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.२ स्वच्छता कामगारांचे गेल्या चार वर्षात ठेकेदाराने ई.पी.एफ च्या रक्कमा भरलेल्या नाहीत त्या बाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करा. ३.कंत्राटी कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून काम करीत असलेल्या स्वच्छता कामगारांना कायम करावे याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. तसेच स्वच्छता कामगारांना विविध सुविधा ही उपलब्ध करुन द्यावे
अशा विविध माग्णया साठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनास आर. पी.आय, बहुजन कामगार संघटना, पीपल्स पाॅवर आॅफ नेशन, समाजसेवक, राजे प्रतिष्ठाण, व विविध संघटनेने पाठिंबा दिला. त्यावेळी जिल्हा नियोजन समीतचे अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,भाजपाचे शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, सभापती प्रवीण खवतोडे, आर पी आय चे श्रीकांत हुवाळ, बबलु सुतार, साईनाथ शिंदे, किरण घोडके, गणेश धोत्रे, अक्षय मुदगुल, शाहिद जमादार, येताळा भगत, लताबाई शिकतोडे,मंदाबाई ढोकळे ,आशा जावीर, आशा प्रक्षाळे, लक्ष्मी, सिध्देशवर खरबडे, सुनिल अवघडे, व कर्मचारी उपस्थित होते.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज