मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील उजनी कालवा दुरुस्तीसाठी व अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ६५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली असून ही कामे झाल्यास सुमारे ४ हजार हेक्टर वाढीव क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याची माहिती आमदार भारत भालके यांनी दिले.
मंगळवेढा तालुक्याला उजनी उजवा कालवा फायदेशीर ठरला आहे .मंगळवेढा तालुक्यात ९४ कि . मी . ते १३२ कि . मी. लांबीचा उजवा कालवा लाभला असून या कालव्यामुळे तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
बोराळे , सिद्धापर अरळी . नंदर . डोणज . भालेवाडी . फटेवाडी . खोमनाळ , कर्जाळ , कात्राळ , हुलजंती , मरवडे , देगाव , घरनिकी , मारापूर , डोंगरगाव , कचरेवाडी , कारखाना साईट , मंगळवेढा शिवार , लक्ष्मी टाकळी , गादेगाव – सोनके येथील वितरीका डोंगरगाव खडकी येथे रस्ता क्रॉसिंग पूल बांधणे , शेवटच्या भागात बंद नलिकेद्वारे पाणी देणे , उजनी वसाहत मंगळवेढा येथे अंतर्गत रस्ते , कार्यालयीन दुरुस्ती कामे , उजनी उजवा कालवाअस्तरीकरण , दुरुस्ती सेवापथ व निरीक्षण पथ दुरुस्ती करणे , नंदूर , बोराळे , हुलजंती मायनर कर्जाळ , कात्राळ वितरिका , वितरिका , लघुवित्रिका कालव्याचे अस्तरीकरण , खोदाई , ही दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असून या कामासाठी सुमारे ६५ कोटीचा निधी लागणार असून या कामामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सुमारे वाढीव ४ हजार क्षेत्र सिंचनाखाली येणार येणार आहे.
त्यामुळे या कामासाठी तातडीने ६५ कोटी उपलब्ध करून देण्याची मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे अशी माहिती आ भारत भालके यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज