mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या हत्येचा प्रयत्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या हत्येचा प्रयत्न


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

एका घटस्फोटीत महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुनील जाधव असे या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून सुनीलची पीडित महिलेवर नजर होती. तो अनेकदा तिला त्रास द्यायचा. त्या महिलेसोबत छेडछाड करायचा. तिला त्रास असह्य झाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार केली. मात्र पोलिसांनी समज देऊन आरोपी सोडले.इथंच आरोपीचं फावलं.काल (22 फेब्रुवारी) त्याने ‘तू माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा मी तुला जगू देणार नाही?’ अशी धमकी दिली. त्यानंतर क्षणार्धात त्या महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ती पीडित महिला गंभीर जखमी झाली.

सध्या तिच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. हिंगणघाटची घटना ताजी असताना बीडमध्ये जिवंत मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महिलेचे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणाची मागणी पीडितेच्या कुटुंबांनी केली आहे.

तर दुसरीकडे ‘टीव्ही 9 मराठी’ने ही बातमी दाखवल्यानंतर बीडमधील पोलीस यंत्रणा कामाला लागली. फक्त चार तासांच्या आत या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. महिलेची हत्या करुन हा आरोपी लपून बसला होता. पोलिसांनी फोन लोकेशनवरून त्याचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.

काही दिवसांपूर्वी हिंगणघाट मधील प्रकार समोर आला असताना आता बीडमध्येही जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरुन बीडमधील महिला किती असुरक्षित आहेत. ते सांगण्याची गरज नाही. पोलीस अधीक्षकांनी एकीकडे महिला आणि मुलींसाठी सुरक्षाकवच नावाची योजना राबविली. दुसरीकडे मात्र भर दिवसा अशा भ्याड हल्ल्यामुळे पोलिसांच्या महिला सुरक्षा कवच योजनेचा धज्जा उडल्याचं दिसून आले. आता या आरोपीवर पोलीस काय कठोर कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंढरपूर येथील अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

पंढरपूर येथील अपघातातील जखमी तरूणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा