मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
घरातील भांडणाच्या किरकोळ कारणावरुन भाच्याने वडिलांच्या मदतीने मामाचा खून केल्याची घटना शहरातील मुळजरोड भागातील भारत नगरमध्ये शनिवारी (ता.२२) रात्री घडली.
याबाबतची माहिती अशी की, डौरी गोसावी समाजातील लोक भारत नगर भागात रहातात. शिवाजी हरिश्चंद्र सावंत या मजूरी करणाऱ्या व्यक्तीची एक बहिण पार्वती ही पती रामराव भानुदास साळूंके व मुलाबाळासह भारत नगर भागात रहाते.
शिवाजीची दुसरी बहिण सकिना यांच्या घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम शनिवारी (ता.२२) जळकोट येथे होता. तेथे दुपारी रामराव व शिवाजीचा लहान भाऊ सखाराम सावंत यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.
गंभीर जखमी अवस्थेतील अर्जुनला पहिल्यांदा खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अर्जुनला मयत घोषित केले. या प्रकरणी शिवाजी सावंत दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ अर्जुनच्या खून प्रकरणी भाऊजी रामराव व भाच्चा जालिंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बाप लेकाला अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार वाघ तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज