मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
नवऱ्याने घेतलेले पैसे दयायला सांग असे म्हणत पाटखळ येथील एका २४ वर्षीय महिलेचा त्याच गावातील एकाने विनयभंग केल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दि . २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वा सदर महिला ही घरात असताना बाळू बापू बोडरे (रा.पाटखळ) याने पाठीमागील दरवाज्याने घरात येवून तुझ्या नवऱ्याने पैसे घेतले आहेत ते मला दयायला सांग म्हणून तीच्या साडीचा पदर ओढून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून चापट मारली अशी फिर्याद त्या महिलेने मंगळवेढा पोलिसांत दिली .
पोलिसांनी सदर आरोपीविरूध्द भा.दं.वि.स. कलम ३५४ अ, ४५२, ३२३ अनूसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील हे करीत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज