मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोरी झाली . चोरांनी चार लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व एक होंडा शाईन मोटार सायकल चोरून नेली आहे . ही धाडसी चोरी गुरुवी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बालाजी पांडुरंग कदम ( रा . तुंगत ) यांनी फिर्याद दिली आहे.तुंगत येथील बालाजी पांडुरंग कदम यांच्या घरातील सर्वजण घराबाहेर झोपले होते. घरात कोणीच नाही याचा फायदा घेत चोरांनी घराचा दरवाजा तोडून घरातील २५ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम २५ हजार रुपये असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याच दरम्यान विठ् ठल कृष्णा रणदिवे यांच्या घरातील १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख १ लाख ३५ हजार असा१ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेला . त्यानंतर वसंत गणपत रणदिवे यांच्याही घरासमोर लावलेली ७० हजार रुपये किमतीची होंडाशाईन मोटार सायकल चोरांनी चोरून नेली आहे . चोरांनी तीन ठिकाणी धाडसी चोरी करून ४ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे . चोरीच्या घटनेनंतर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी पाहणी केली असून अकि तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वलेकर हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज