मं. टा. वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील इमाम जमाल पठाण (वय.55) यांचा दुचाकीची समोरासमोर जोराची धडक लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.ही घटना मंगळवेढा-उचेठाण रोडवर उचेठाण परिसरात घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मयत इमाम पाठव व त्यांचा बारा वर्षाचा नातू हे डोंगरगाव येथून नातेवाईकाच्या लग्न कार्यासाठी जात असताना उचेठाण परिसरात त्यांच्या दुचाकीस समोरूनच येणाऱ्या अज्ञात दुचाकीचालकाने समोरासमोर जोरदार धडक दिल्याने मयत इमाम पठाण यांच्या डोकिस गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सी.एन.एस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते मरण पावले असून मयत इमाम पठाण हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज