पुणे । दुसर्याचे घर आणि कार स्वतःचीच असल्याचे सांगून लग्न जुळवले; मात्र लग्नानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विवाहितेने सांगवी पोलिसांत धाव घेत सासरच्या पाच जणांविरोधात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार पती अविनाश आनंद चौधरी, सासू आशा आनंद चौधरी, सासरा आनंद गणपती चौधरी, दीर अमोल आनंद चौधरी, जाऊ स्वप्नाली अमोल चौधरी (सर्व रा. मधुबन सोसा. जुनी सांगवी) यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे. फिर्यादी आणि आरोपी अविनाश यांचे सन 2013 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर फसवणूक झाल्याचे विवाहितेच्या लक्षात आले. तसेच, अविनाशचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचेही काही दिवसांनी उघड झाले.
सन 2016 मध्ये विवाहितेला मुलगी झाली. त्यामुळे आरोपींनी मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज