मं.टा.प्रतिनिधी । स्वप्नील गरड
आजही ग्रामीण भागात घरोघरी आपल्याला सायकल पाहावयास मिळते. त्याच पद्धतीने लहानपणापासून विज्ञानाची आवड असणाऱ्या स्वप्नील माळीने सर्वसामान्यांना परवडणारी आणि कमी खर्चात मिळणाऱ्या सायकलपासून प्रदूषणविरहीत दुचाकी तयार केली आहे. या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील राहणाऱ्या स्वप्नीलची आई घरकाम करते तर वडिलांचे गावातच इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. तो आहेरवाडी येथील श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात नववीत शिक्षण घेत आहे. घरापासून दोन किलोमीटर तो आणि त्याचा मित्र शाळेत चालत जात असे.
त्यासाठी लागणारे सर्व साहित्य हे वडिलांच्या दुकानातील टाकाऊ असलेल्या वस्तूंचा वापर करून दुचाकी तयार केली. दुचाकी एक लिटर पेट्रोलमध्ये 100 ते 120 किमी धावते. त्याला ही दुचाकी तयार करण्यासाठी आठ-दहा हजार रुपये खर्च आला आहे. सर्वसामान्यांना परवडेल आणि वाढत्या पेट्रोलचे दर हे न परवडणारे असल्यामुळे त्या दुचाकीचा वापर व्हावा, या उद्देशाने त्याने स्वत: दुचाकी तयार केली आहे. या दुचाकीचा वापर शेतात फवारणी करण्यासाठीही करता येतो. तसेच त्यातील पेट्रोल संपले तरीही ती दुचाकी चालवता येते. ही प्रदूषणविरहीत दुचाकी बनवत असताना वडील विठ्ठल माळी, शाळेतील एस. व्ही. कुनाळे, आर. एस. उमाटे यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती स्वप्नील माळी बोलताना दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज