मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । पोहण्यासाठी वॅनोलमध्ये उतरत असताना तोल जाउन पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे संगीत विशारद पत्नीसह पतीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला कालव्यामध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैलास यांचे चष्माचे दुकान असून रेश्मा संगीत विशारद होत्या. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास दोघेही खडकवासला परिसरातील कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी वॅनोलमध्ये उतरत असताना कैलासचा तोल गेल्याने ते पडले. त्यावेळी रेश्माने त्यांना वाचविण्यासाठी हात दिला असता, त्यांचा तोल गेला. त्यामुळे दोघेही पती-पत्नी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पीएमआरडीए अग्निशमक दलाला दिली. त्यानंतर नांदेड सिटी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंडाच्या सहाय्याने कैलास आणि रेश्माचा मृतदेह पाण्याबाहेर काढले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित घटना हवेली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली असल्याने पुढील तपास हवेली पोलिस स्टेशनकडे वर्ग केला जाणार आहे. अशी माहिती सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे हवालदार रुस्तम शेख यांनी दिली
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज