मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील उपळाई येथील एका आरोपीस विशेष जिल्हा न्यायाधीश अ. ब. भस्मे यांनी बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये दहा वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली.
किरण मसा भोसले (रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) असे याप्रकरणी शिक्षा देण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी किरण भोसले याने पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर जबरी अत्याचार केल्याचा गुन्हा 1 ऑगस्ट 2017 रोजी वैराग पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी युक्तिवादात हे कृत्य पीडितेवर जबरदस्तीने केलेले आहे तसेच आरोपीने घेतलेला बचाव व बचावासाठी तपासलेले साक्षीदार यांच्यामध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आणून दिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली. वैराग पोलिस ठाण्याचे एस. टी. आळणे व तपासिक अधिकारी म्हणून रवींद्र खांडेकर यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज