मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । गेल्या अनेक वर्षापासून निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या महात्मा बसवेश्वर व संत चोखोबांच्या स्मारकाला अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील जनतेतून महाविकास आघाडी सरकारचे जनतेनी आभार मानले.
बाराव्या शतकात मंगळवेढ्यात वास्तव्य होऊन गेलेल्या संत महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी निधी मिळावा म्हणून आ.भारत भालकेनी गेल्या दहा वर्षापासून सातत्याने विधानसभेत आवाज उठवला.दरम्यान भाजप सरकारच्या काळात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समितीची स्थापना करण्यात आली.पाच वर्षांमध्ये स्मारक समिती याबाबत बैठका व वारंवार स्थळ निश्चित वारंवार बैठका झाल्या.देखभाल दुरूस्ती कुणी करायची यावरून हा प्रस्ताव परत आला.विधानसभा निवडणुकीपूर्वी या स्मारकाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती परंतु स्मारकाला मुहुर्त लागला नाही.
या रखडलेल्या प्रश्नावरून विधानसभा निवडणूकीत मोठे रणकंदन झाले.आजच्या आजच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली चोखोबाच्या स्मारकाला निधी मिळावा म्हणून नागरिकांनी चोखोबाच्या समाधीसमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
यावेळी सर्वच राजकीय नेत्यांनी चोखोबाच्या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावतो असे सुतोवाच दिले.परंतु प्रत्यक्षात मात्र या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावला नाही परंतु आता या सरकारने या स्मारकाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या दोन्ही स्मारकाच्या माध्यमातून मंगळवेढा संतांची सृष्टी पाहण्यासाठी पर्यटक वाढण्यास मदत होणार आहे शिवाय त्याच्या दर्शनासाठी इतर ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांचा ओढा वाढणार आहे.या भागातील तरुण बेरोजगार तरुणांना भविष्यात रोजगार उपलब्ध होणार आहे.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज