मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । ६५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या मदत निधीत १ हजारांची वाढ केली जाणार आहे. तसेच मागील पाच वर्षांत बंद झालेल्या पेन्शन योजना सुरू करणार आहे. त्याचबरोबर मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ग्राम विकास व पंचायत राज अभियान, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तपोवन मैदानावर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुश्रीफ म्हणाले की, महिलांना संरक्षण देणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे आमचे कर्तव्य आहे.लवकरच शासकीय रिक्त जागेची मेगा भरती सुरू होईल. मुलाबाळांना शिकवा, उद्योगात सक्षमपणे काम करा तरच हा मेळावा यशस्वी होईल, असेही ते म्हणाले. तसेच उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरुन ५० हजार करणार असल्याचे त्यानी सांगीतले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या महिलांना बरोबर घेतले नाही म्हणून आशिया खंडातील देश मागे राहिले. महिलांना या आधीच सोबत घेतले असते तर देश महासत्ता झाला असता.
यापुढे भविष्यात ती भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि संसद, विधानसभेत आरक्षण द्यावे लागेल. बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यामध्ये दुधाच्या पदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. महिलांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महिला सुरक्षा कायदा केला जाईल. त्याचबरोबर आरोपीला लवकरात लवकर कशी शिक्षा होईल याबाबतही कायदा करू असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगीतले.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज