मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । प्रथमेश स्पोर्टस क्लबतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त १५ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत जुळे सोलापूर महिला महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती क्लबचे सचिव ज्योतिर्लिंग शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. जुळे सोलापुरातील शिवशंकर मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये हा महोत्सव होणार आहे.
उद्घाटन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते होणार असून, याप्रसंगी क्लबचे संस्थापक प्रथमेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. १६ ते ३० या वयोगटातील मुली व महिलांसाठी डान्स स्पर्धा, सोलो डान्स, ग्रुप डान्स, मिस सोलापूर, मिसेस सोलापूर, लिंबू चमचा, संगीत खुर्ची आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
तसेच कराटे प्रशिक्षण, आरोग्य शिबिरही घेतले जाणार आहे. पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. विजेत्या पाच महिलांना पैठणी साड्या, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले जाणार आहे. माहितीसाठी महिलांनी १० मार्चपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज