मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । अतितातडीच्या जमीन मोजणीसाठी 25 हजार रुपयांची लाच घेताना भूमी अभिलेख विभागाच्या भूकर मापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. गणेश रमेश साळुंखे (वय 32, रा. गुरूश्री अपार्टमेंट, मूळ रा. पाटेश्वरनगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
तक्रारदाराच्या चुलत भावाच्या जमिनीची अतितातडीची मोजणी करावयाची होती. त्यासाठी त्यांनी सातारा भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला. मात्र, भूकरमापक गणेश साळुंखे यांनी या कामासाठी 25 हजार रूपये लाच मागत तक्रारदाराचा मागणी अर्ज प्रलंबित ठेवला. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्याकडे अर्ज केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज