मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा । पाकणी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या मोहोळ तालुक्यातील गलांडेवाडी येथील ३0 वर्षीय तरुण रेल्वे प्रवासादरम्यान खाली पडल्याने – मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्यादरम्यान रामहिंगणी शिवारात घडली.
सचिन तानाजी सुळे असे मृताचे नाव आहे . सचिन सुळे हे नातेवाईकांना भेटण्यासाठी : पाकणी ( ता . उत्तर सोलापूर ) येथे गेले होते . ते मंगळवारी सोलापूर – पुणे पॅसेंजर रेल्वेतून पाकणीहून अनगरकडे येण्यासाठी निघाले होते . दरम्यान रामहिंगणी शिवारात मृतावस्थेत मिळून आले. वडील तानाजी सुळे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज