mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, असे जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.बैठकीस महापालिका आयुक्त दीपक तावरे,निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर वाघमारे,अश्विनी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी डॉ.सत्येश्वर पाटील, राज्य राखीव पोलीस बल गटाच्या आरोग्य अधिकारी डॉ. मीनाक्षी बनसोडे, महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, रेल्वेचे डॉ. संजीव ए. के., डॉ. विठ्ठल घडके आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूची पुण्यात पाच जणांना बाधा झाली आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे सर्व दवाखाने  आणि खासगी रुग्णालये येथे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाबाबत जागरुकता निर्माण करावी. विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, याची लोकांना माहिती द्यावी , असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

परदेशातून जाऊन आलेल्या किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्याक्तिस कोरडा खोकला, ताप, घसा दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी तात्काळ नजीकचे शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत. यासंदर्भात देखरेखेसाठी आणि नियंत्रणासाठी  टोल फ्री क्रमांक 104 आणि जिल्हाधिकारी कार्यालयात  नियंत्रण कक्ष (0217-2731012) सुरु करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी खासगी रुग्णालये, खासगी वैद्यकीय संस्था यांनी सहकार्य करावे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.  लोकांचे प्रबोधन करावे,असे आवाहनही  श्री. शंभरकर यांनी केले.

बैठकीस डॉ. सुदीप सारडा, डॉ. माधव गुंडेटी, डॉ. संतोष हराळकर, डॉ. सुधांशू कोठडिया, डॉ. पुप्पाई अग्रवाल, डॉ. रोजन बेंबरे, डॉ. रामेश्वर डावकर, डॉ. सुरेश कंदले आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाची लक्षणे :-

·         कोरडा खोकला

·         ताप येणे

·         घसा दुखणे

·         अशक्तपणा

·         श्वासास त्रास होणे

काय करावे :-

·         प्रवास टाळावा

·         गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये

·         खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा

·         वैयक्तिक स्वच्छता पाळावी

·         साबणाने हात धुवावे

·         गर्दी होईल असे कार्यक्रमाचे संयोजन टाळावे

·         अफवांवर विश्वास ठेऊ नये.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: SamajikSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
महाराजांनी केले असे काही महिलेने केला गुन्हा दाखल!

महाराजांनी केले असे काही महिलेने केला गुन्हा दाखल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 3, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विसरली सुट्टी; मंगळवेढा तहसीलमध्ये रात्रंदिवस खटपट

November 2, 2026
सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

सूर्योदय परिवाराचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अजित शिंदे यांना प्रदान; उपस्थितांच्या अलोट गर्दीत सूर्योदय फाउंडेशनचा शिक्षकदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न

November 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा