मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । तुला घरातील काम येत नाही घर नीट ठेवता येत नाही म्हणून सासू व पती विवाहितेला मारहाण करीत होता.सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी दि.११ मार्च रोजी गोटेवाडी ता.मोहोळ येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याप्रकरणी पती व सासरच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना हिचे सन २०१२ मध्ये गोटेवाडी येथील नागेश सुभाष कसबे याचे बरोबर विवाह झाला होता.
दरम्यान त्यांना दोन अपत्य झाले.सपना व नागेश यांचा संसार व्यवस्थित चालु होता.सपना ही पाकणी येथे कामाला जात होती.परंतु गेल्या दोन तीन महीन्यापासुन तिला पती नागेश व सासू रतन सुभाष कसबे तु कामला जायाचे नाही असे सांगितल्याने ती कामाला जात नव्हती.नागेश आला दारू पिण्याचे व पत्ते खेळण्याचे व्यसन जडलेले होते.त्यातून तो दारू पिऊन पैसे दे म्हणून सपना हीला सतत मारहाण करीत होता व सासु रतन तु घरातील कामकाज करीत नाही,निट स्वयपाक करीत नाही असे म्हणून तिला जाचहाट करीत होते.
याबाबत सपना ही वारंवार आई पुष्पा यांना सांगत होती.दि.३ मार्च रोजी नागेश याने सपना हिच्या आईला फोन करून तुमची मुलगी नीट राहत नाही तिला घेऊन जावा असे सांगितल्याने पुष्पा यांनी सपना हिला मोहोळ येथे आणले होते.त्यानंतर दि .१० मार्च रोजी नागेश हा मोहोळ येथील सपनाच्या माहेराला आला व मुलीला नीट नांदतो असे सांगून घेऊन गेला.त्यानंतर दि.११ मार्च रोजी रात्री ८ वा . दरम्यान सपना हिच्या सासूने मुलीची आई पुष्पा यांना फोन करून तुमच्या मुलीने घरात गळफास लावुन घेतलेला आहे.
आम्ही सोलापुरला आश्वीनी हॉस्पीटला घेऊन गेलो आहोत तरी तुम्ही सोलापुरला या असे सांगितले. सोलापुरला आश्वीनी हॉस्पीटला मुलगी मयत झाल्याचे समजले.त्यानुसार मृत सपनाची आई पुष्पा खंडू कांबळे यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात जावाई नागेश कसबे व त्याची आई रतन कसबे यांचेविरूध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र बुरंगे हे करीत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज