मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मध्यप्रदेशमध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटू शकतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावात ते काम करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा अपमान कधीही सहन केला नसता. उद्धव ठाकरे यांनी परत भाजपसोबत आले पाहिजे. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. सोमवारी नागपुरात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांना आम्ही फोडलेले नाही. भाजपला कोणालाही फोडण्याची आवश्यकता नाही. मध्यपदेशमध्ये कमलनाथ सरकार अल्पमतात आहे. परंतु त्यांना बहुमत चाचणीसाठी वेळ मिळाला. त्यांच्याप्रमाणे बहुमत सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जास्त वेळ मिळाला असता तर चित्र वेगळे राहू शकते, असे रामदास आठवले म्हणाले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनावश्यक टीका करत असल्यामुळे त्यांची प्रतिमा खराब होत आहे, असे मतदेखील आठवले यांनी व्यक्त केले. केंद्राने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज