मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चक्कर येऊन पडल्याने डोक्यात मार लागल्याने दत्तात्रय आत्माराम भडंगे ( वय ३० , रा . आगलावेवाडी जवळा ) या युवकाचा मृत्यू झाला.
ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जवळा बसस्थानकाजवळ घडली . याबाबत मिळालेली माहिती अशी, दत्तात्रय आत्माराम भडंगे वय ३० रा . जवळा ता . सांगोला या युवकास चक्कर आल्याने तो खाली पडला .
यावेळी डोक्यास मार लागल्याने त्यास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच भडंगे यांचा मृत्यू झाला. याबाबत बबन गेजगे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज