टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून आज पुन्हा 378 रुग्णांची भर पडली आहे तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांमध्ये आजची संख्या ही सर्वात कमी असल्याचे अहवालावरुन दिसून येते. त्याचे कारण म्हणजे आज करण्यात आलेल्या चाचण्यांचे प्रमाणही कमी आहे. कदाचित यामुळे बाधितांची संख्या कमी आली असण्याची शक्यता आहे.
आज एकूण 1 हजार 119 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 हजार 141 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 378 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 231 पुरुष आणि 147 महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर आज कोरोनामुक्त झाल्यामुळे 250 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 24 हजार 374 जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर 666 जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित झाल्यामुळे वेगवेगळ्या दवाखान्यात 6 हजार 397 जण उपचार घेत आहेत तर कोरोनामुक्त होऊन 17 हजार 311 जण आपापल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत.
आज ‘या’ गावातील सात जणांचा बळी
मंगळवेढा शहरातील खंडोबा गल्ली येथील 46 वर्षाचे पुरुष, लऊळ (ता. माढा) येथील 55 वर्षाचे पुरुष, जावळी प्लॉट बार्शी येथील 80 वर्षाचे पुरुष, ताडसौंदणे (ता. बार्शी) येथील 75 वर्षांचे पुरुष, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 85 वर्षाचे पुरुष, उक्कडगाव (ता. बार्शी) येथील 65 पुरुष, सांगोला येथील 45 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
In rural Solapur today, 378 new corona positive and seven deaths
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज