मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्हयातून हद्दपार केलेला आरोपी रोहित उर्फ आण्णा विठोबा आसबे (रा . सप्तश्रृंगीनगर) हा उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचा भंग करून मंगळवेढा शहरातील टोळ नाका परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करून फिरत असल्याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करून जेरबंद केले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील आरोपी रोहित उर्फ आण्णा आसबे याला प्रांताधिकारी यांनी दि.१६ /१०/२०१९ रोजी सोलापूर जिल्हयातून हद्दपार केले होते. दि.२० मार्च रोजी दुपारी १२.४५ वा. टोळ नाक्याजवळील डोके हॉस्पीटलजवळ हद्दपार असताना महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता निषिध्द असलेल्या क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश करून वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.याची फिर्याद पो.हे.कॉ चन्नप्पा म्हेत्रे यांनी दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी आण्णा आसबे याला जेरबंद केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज