मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेक झाल्यानंतर आपल्या भारत देशात बाधित यांची संख्या ४१५ तर महाराष्ट्रात एकूण ८९ वर जाऊन पोहोचली आहे. या आजाराला नियंत्रण मिळवण्यासाठी जनता कर्फ्यु त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊन झाल्याने चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो रस्ते गजबजलेल्या बाजारपेठ अशा निर्मनुष्य झाल्या होत्या.
कोरोनाच्या संकटात संयमाने व धैर्याने मुकाबला करण्याचा संदेश देशवासीयांना देण्यात आला. कोरोना जनजागृती देशसेवा, समाजसेवक (एन.जी.अो.), पीपल्स पाॅवर आॅफ नेशन (एन.जी.अो.),लक्ष्मी कृषी विकास प्रोडूसर कंपनी च्या वतीने व्यापक जागृती करण्यात येत आहे.
कोरोना या साथीच्या आजाराने देशभरासह मुंबई-पुणे ठाणे पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्याकरिता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतीय स्थितीचा विचार करताना इथल्या प्रचंड लोकसंख्येत विविध क्षेत्रात जी कामगार शक्ती विभागली गेलेली आहे. त्यात असंघटित कामगारांचे प्रमाण मोठे आहे.कष्टाच्या जीवनातील समस्या असूनही असंघटित क्षेत्रातील कामगार हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.
राज्यात जवळपास २.४० कोटी शेतमजुर,२० घरेलू कामगार, ३० लाखांहून अधिक बांधकाम कामगार व तत्सम क्षेत्रातील निगडित कामगार २ लाखाहून अधिक माथाडी कामगार ३२ हजार सुरक्षारक्षक रस्त्यावरील फेरीवाले यांची संख्या लाखाच्यावर आहे त्याचा विचार करता अधिकतम म्हणजे ९१% टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या असंघटित क्षेत्रांमधील विविध व्यवसाय मध्ये काम करत आहे अल्पभूधारक शेतकरी साफसफाई व इतर कामगार आहेत.
पंजाब व उत्तर प्रदेश शासने कोरोनो व्हायरसच्या कहर मुळे श्रमिक कामगारांना मदत जाहिर केली आहे तरी महाराष्ट्रात सुद्धा संपूर्ण बाजारपेठ बंदीमुळे असंघटित कामगारांची उपासमार होत असल्यामुळे ५ हजार रुपये आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने देऊन असंघटित कामगारांना मदत जाहीर करावी अशी मागणी देशसेवा कामगार युनियन चे अध्यक्ष आदित्य हिंदुस्तानी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे.
Advt
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज