मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण जगामध्ये कोरोना थैमान घालत असताना छत्तीसगढमधील एका दाम्पत्याने त्यांच्या जुळ्या मलांची नावे कोविड आणि कोरोना ठेवल्याचे समोर आले आहे . विनय शर्मा आणि प्रीती शर्मा या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली असून त्यांनी मुलाचे नाव कोविड आणि मुलीचे नाव कोरोना ठेवले आहे . रायपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रीती शर्मा यांनी आठवड्यापूर्वी या जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. त्यांचे नामकरण गुरुवारी करण्यात आले.
लोकांच्या मनातून कोविड १९ आणि कोरोना या विषयाची भीती दूर करण्यासाठी अशी नावे ठेवल्याचे प्रीती यांनी सांगितले. तर त्यांच्या या निर्णयाला सोशल मीडियावरुन समर्थनही लाभले आहे . काहींनी या भयंकर साथीच्या आजाराचे नाव मुलांना दिल्यावरुन टिकाही केली आहे. मुलाचे वजन २ . ९ किलो तर मुलीचे वजन २ . ७ किलो आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज