मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना व्हायसचा संसर्ग रोखण्यासाठी 17 मेपर्यंत पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीत कोणत्या गोष्टी करता येणार आणि कोणत्या गोष्टी करण्यासाठी मनाई आहे. याबाबतचा सविस्तर आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ३ मे रोजी रात्री उशिरा दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व दुकाने (मॉल वगळून) उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नागरी क्षेत्रातील सर्व मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स आणि मार्केट बंद राहील तथापि त्या मार्केट कॉम्प्लेक्स व मार्केटमधील अत्यावश्यक वस्तूचे दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नागरी क्षेत्रातील सर्व स्वतंत्र दुकाने , कॉलनी शेजारी असणारी दुकाने आणि रहिवाशी संकुलामध्ये असणारी दुकाने सुरू राहणार आहेत. सोलापूर शहरामध्ये पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचा निर्णय कायम केला आहे . तसाच निर्णय ग्रामीण भागासाठीही घेण्यात आला असून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबतचे स्पष्ट आदेश काढले आहेत.
ग्रामीण भागाच्या प्रतिबंधीत क्षेत्रातील व हॉटस्पॉट क्षेत्रातील केशकर्तनालय बंद राहणार आहेत . दवाखाने , टेलिमेडिसीन सुविधा , औषधालय , वैद्यकीय प्रयोगशाळा बॅंका या सुरू राहणार आहेत . आठवडे बाजार , शाळा , शैक्षणिक संस्था , मंगल कार्यालय , पान टपरी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिला आहे.
खासगी कार्यालय त्यांच्या एकूण मनुष्यबळाच्या 33 टक्के इतक्या मनुष्यबळाचा वापर करून सुरू ठेवता येतील.उर्वरित कर्मचाऱ्यांना घरात राहून काम करावे लागेल.प्रसार माध्यमांसह , इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्यामध्ये डीटीएच आणि केबल सेवेचा समावेश असेल असे उपक्रम सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व इंडस्ट्रीज तसेच मनपा क्षेत्राच्या बाहेरील उद्योग व कारखाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
———————
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज