mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

काळजी घ्या । सोलापूरात कोरोनाचा वाढता धोका ; आज घेतले दोन महिलांचे बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
काळजी घ्या । सोलापूरात कोरोनाचा वाढता धोका ; आज घेतले दोन महिलांचे बळी



मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापुरात कोरोनाने आता वेढा घातला असून सोमवारी एका दिवसात दोन महिलांचे बळी घेतले असून त्यामधील एक महिला ग्रामीण भागातील असल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे.सोलापूर शहर व जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन कोरोना बाधित महिलांचा मृत्यू झाला आहे. आज एका दिवसात सात जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या 135 झाली आहे. एकाच दिवशी दोन महिलांचा मृत्यू झाल्याने सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या आठ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील पाटकुल-पेनुर येथील 26 वर्षीय महिलेला 24 एप्रिल रोजी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

26 एप्रिल रोजी या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान तीन मे रोजी रात्री अकरा वाजता या महिलेचे निधन झाले आहे. आज मृत पावलेली दुसरी महिला ही 65 वर्षांची असून ती सोलापुरातील न्यू पाच्छा पेठ परिसरातील आहे. तीन मे रोजी दुपारी बारा वाजता या महिलेला सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गंभीर स्थितीत दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान अवघ्या एक तासात या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली असून आज सकाळी या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सोलापुरात सोमवारी नव्याने आढळलेल्या सात कोरोना बाधित रुग्णांमध्ये नइ जिंदगी परिसरातील दोन महिला, शास्त्रीनगर परिसरातील एक महिला, न्यू पाच्छा पेठ परिसरातील एक महिला, सोलापूर जवळील देगाव येथील एक पुरुष, गेंट्याल चौका समोरील भगतसिंग मार्केट जवळील एक पुरुष व सोलापुरातील जोडभावी पेठेतील एका पुरूषाचा समावेश आहे. सोलापुरात एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 135 झाली असून आजपर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामध्ये तीन पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 105 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोनावर मात करुन बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या बावीस असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. आयसोलेशन वार्डातील 2258 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन हजार तीन जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

अद्यापही 255 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या 2003 अहवालातील एक हजार 868 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 135 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आज दिवसभरात 116 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 109 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. सात अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामध्ये दोन पुरुष पाच महिला व एका मृत महिलेचा समावेश आहे. आज दिवसभरात कोरोना मुक्त होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या तीन आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

——————–

ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
ग्रामीण भागातील दुकाने बंदच राहणार ; ‘या’ वेळेतही बदल,जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश

ग्रामीण भागातील दुकाने बंदच राहणार ; 'या' वेळेतही बदल,जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून कालवा आणि बोगद्याद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात; ‘एवढ्या’ लाभक्षेत्राला पाणी मिळणार; ‘या’ अखेरपर्यंत पाणी चालू राहणार

March 19, 2026
मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

मंगळवेढ्यात ‘बालाजी कन्स्ट्रक्शन ॲन्ड बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स’ आजपासून सुरु; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार सर्व दर्जेदार साहित्य

March 19, 2026
नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

नंदूरमध्ये ‘श्रीकृपा अर्बन को-ऑप क्रेडिट’ संस्थेचा दिमाखदार शुभारंभ; आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार उद्घाटन

March 19, 2026
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यात ‘प्रभात इलेक्ट्रिकल’ आजपासून सेवेसाठी सज्ज; डीपी उभारणी व दुरुस्ती त्वरित; शेतकऱ्यांच्या वेळेची आणि पैशांची होणार मोठी बचत

March 19, 2026
वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

वाटचाल सोनपावलांची! श्री वैभवलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती बँकेचा आज तिसरा वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व 6 वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

March 19, 2026
राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा