टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये घोषित होण्याची शक्यता असुन तत्पूर्वीच उमेदवार नीता ढमाले यांनी प्रतिस्पर्ध्यांसमोर आपले तगडे आव्हान निर्माण केले आहे.
ढमाले आपल्या प्रचारयंत्रणेसह पूर्ण ताकतीने या निवडणुकीत उतरल्या असल्याने भाजपला आपला गड राखण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावावी लागणार आहे. अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक पहायला मिळणार असल्याने पदवीधर मतदारांना देखील चांगलेच महत्व आल्याचे पहायला मिळत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापुर या जिल्ह्यांचा समावेश असुन पदवीधर मतदारनोंदणी केलेल्या मतदारांनाच या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती, परंतु आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही साधारण निवडणुकांपेक्षा वेगळी असल्याने त्याविषयी मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानाचे आवाहन करण्यापर्यंत उमेदवारांसमोर मोठे आव्हान असते. परंतु नीता ढमाले यांनी आतापासूनच आपली प्रबळ दावेदारी केल्याने या निवडणुकीला चांगलीच रंगत येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील मतदारांना निवडणूक आणि उमेदवाराविषयी परिचय करुन देण्यासाठी त्यांनी आतापासूनच आपली यंत्रणा कामाला लावली आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची जनजागृती करणे, प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन आपल्या परिचयपत्राच्या माध्यमातून त्यांना आपली ध्येय उद्दिष्टे पटवून देण्यावर त्यांचा भर आहे.
नीता ढमाले या स्वतः उच्चशिक्षित असुन आपल्या नंदादीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्या विविध सामाजिक कामाचा ठसा उमटवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्यांदाच इतके तगडे आव्हान असल्याने भाजपसह इतर प्रतिस्पर्ध्यांना आपले सर्व कसब पणाला लावावे लागणार आहे.
एकंदर या सर्व पार्श्वभूमीवर निवडणुकीआधीच नीता ढमाले यांनी उभी केलेली यंत्रणा आणि नियोजनबद्ध प्रचार यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात ढमालेंचा प्रभाव वरचढ राहणार असे चित्र निर्माण झाले आहे.
Pune graduates: Nita Dhamale’s tough challenge in front of her rivals
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज