
टीम मंगळवेढा टाईम्स । सध्या कोरोनाचे संकट जगावरचा आले असून यामुळे सर्व शाळा, कॉलेज वार्षिक परीक्षेपूर्वीच बंद करण्यात आल्या यामुळे विद्यार्थ्यांना घरांमध्येच बसून राहावे लागत आहे घरात बसूनच त्यांना स्पर्धा परीक्षांचा सराव करता यावा यासाठी इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम च्या वतीने लॅाक डाऊन सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन सराव टेस्ट मोफत उपलब्ध करून दिली असून यास महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असल्याचे राज्य समन्वयक आनंदकुमार लोंढे यांनी माहिती दिली.
कोरोनाने साधारण मार्च महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात प्रवेश केला यामुळे 22 मार्चपासुन लॅाकडाउन जाहीर करण्यात आला. आता आपण लॅाकडाउनच्या चौथ्या टप्प्यात असुन सर्वांना घरातच बसून राहावे लागत आहे. यानंतर महाराष्ट्रातील शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला व तात्काळ कार्यवाही झाली. यामुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा ही झाल्या नाहीत. घराबाहेर पडणे पालकासह विद्यार्थ्यांनाही मुश्कील झाले आहे. घरामध्ये सतत खेळून तसेच टीव्ही बघून कंटाळा येत आहे त्यासाठी घरामध्ये मुलांना बसून नाविन्यपूर्ण अभ्यास करता यावा व घरबसल्या स्पर्धा परीक्षेचा रोज सराव व्हावा या उद्देशाने इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोज मोफत सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
लॅाकडाउन सुरू झाल्यापासून हा उपक्रम सुरू केला असून यामध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रोज मोबाईलवर स्पर्धा परीक्षेचा सराव होत असून मार्कही लगेच समजत असून काय चुकले ,काय बरोबर हेही मुलांना स्क्रीनवर दिसत असल्याने विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन या सराव टेस्ट सोडवत आहेत. मोफत स्पर्धा परीक्षा सराव उपक्रमास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे आनंदकुमार लोंढे यांनी सांगितले.
एप्रिल- मे 2020 या महिन्यात कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने तसेच सध्या पालकांचे आर्थिक गणित बिघडल्याने सर्व विद्यार्थ्यांना मोफत अॅानलाईन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा या उद्देशाने इंटरनॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम या स्पर्धा परीक्षातर्फे मोफत स्पर्धा परीक्षा सराव हा उपक्रम राबविण्यात येत आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













