mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

६५ एकर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात ‘कोविड’ रुग्णालय उभारावे : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
६५ एकर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात ‘कोविड’ रुग्णालय उभारावे : समाधान आवताडे

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत जात असताना आता कोरोनाने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणभागातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.पाच दिवसापूर्वी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर या रुग्णास जनकल्याण दाखल करण्याचा प्रयत्न केला असता या परिसरात अनेक हॉस्पिटल्स,ब्लड बँक आणि दाट रहिवाशी लोकवस्तीचा परिसर असल्याने विरोध झाला.

त्यानंतर प्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयातच कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला पण एकीकडे अनेक खाजगी दवाखाने बंद असल्याने शहर व ग्रामीण भागातील इतर आजार,अपघात याचा सामना करावा लागणाऱ्या सर्वसामान्य वर्गातील रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय हा सक्षम पर्याय उरलेला असताना या ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांना दाखल करणे चुकीचे ठरेल असा समर्पक दावा करण्यात येऊ लागला व या परिसरातील नागिरकांचाही यास विरोध होऊ लागला आहे.अशातच पंढरपूर शहर तालुक्यात काल ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि होणारी गैरसोय लक्षात घेता पंढरपूरचे प्रांताधिकारी,नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांनी समन्वयाने निर्णय घेत ६५ एकर परिसरात कोरोना बाधित रुग्णांसाठी प्राथमिक स्वरूपात दाखल करण्याची व उपचाराची सोय करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी अशी प्रतिक्रिया दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी व्यक्त केली आहे.                  

याबाबत बोलताना समाधान आवताडे म्हणाले कि,एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यास तातडीने आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्याची आवश्यकता नसते हे विविध कोविड हॉस्पिटलच्या ठिकाणची उपचारः प्रणाली पाहता आढळून येत आहे.बहुतांश पॉझिटिव्ह रुग्णांना तर कुठलेही लक्षणे देखील आढळून आली नव्हते तर मधुमेह,हृद्यरोग,दमा,ब्लडप्रेशर आदी विकार असलेले वृद्ध हे सिरीयस होताना दिसून येत आहेत पण यावरही मात करून बरेही होत आहेत.पंढरपुरात काल आढळून आलेल्या रुग्णांनाही किरकोळ सर्दी वगळता कुठलाही गंभीर स्वरूपाचा त्रास होत नव्हता असे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे असे प्रतिकार शक्ती चांगली असलेले रुग्ण काही दिवसातच ठणठणीत बरे होत आहेत.त्यामुळे ६५ एकर परिसरात तात्पुरत्या स्वरूपात कोविड रुग्णालय उभारले तर या ठिकाणी कमी लक्षणे असलेल्या अथवा त्रास नसलेल्या पण कोरोना पॉजिटीव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांना नियमित उपचारासाठी ठेवता येणे शक्य आहे.

पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले,नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे हे अतिशय समन्वयाने आणि दक्षतेने उपायोजना करीत असताना पंढरपूर शहर व तालुक्यात आढळलेल्या कोरोना रुग्णाची सोय पंढरपूर परिसरात होणे गरजेचे आहे हे ओळखून सुजाण नागिरकांनी यासाठी आग्रह धरला पाहिजे आणि या गंभीर प्रकरणात कोणीही राजकरण करू नये अशी आशा  त्यांनी व्यक्त  केली.

Pandharpur A temporary Kovid hospital should be set up in an area of ​​65 acres : samadhan awatade

————————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
दिलदारपणा : आमदार भारत भालके हे स्वतःचा राहता बंगला क्वारंटाईनसाठी देणार

दिलदारपणा : आमदार भारत भालके हे स्वतःचा राहता बंगला क्वारंटाईनसाठी देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 10, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

मोठी बातमी! अखेर भारत- पाकिस्तान सामना होणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार; पीसीबी-आयसीसीच्या बैठकीनंतर निर्णय

February 9, 2026
हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

हाबडा! मंगळवेढ्यात आमदार आवताडे यांचा धमाका; विरोधकांना चारीमुंड्या चितपट करत तालुक्यावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व; ‘समाधान’कारक विजय, विरोधक गारद

February 9, 2026
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

February 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा