टीम मंगळवेढा टाईम्स । इतर राज्यातून व इतर जिल्हयातून प्रवास करण्यास शासनाने बंदी घातली असताना त्याच्या आदेशाचा भंग करून मंगळवेढयात प्रवेश केल्याप्रकरणी आठ नागरिकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी शासनाने राज्यात व अन्य जिल्हयातून विना परवाना येण्यास व प्रवास करण्यास बंदी घातली आहे असे असतानाही बुधवार दि. 27 मे रोजी नवनाथ अंबादास लेंडवे,दिनेश भारत लेंडवे (रा. लेंडवे चिंचाळे),प्रविण सुरेश जाधव,मेनका प्रविण जाधव(रा.खडकी),संपदा सुभाष कांबळे,संदिप सुभाष कांबळे,निकिता संदिप कांबळे,पल्लवी नितीन गाडे(रा.येड्राव) अशा 8 नागरिकांविरूध्द भा.द.वि.सं.कलम 188,269,270 साथीचे रोग अधि. 2,3,4 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याची फिर्याद पोलिस नाईक राजकुमार ढोबळे यांनी दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Crimesfiled against 8 citizens who entered mangalwedha without permission
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज