mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

करोनाच्या भितीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
करोनाच्या भितीने सोलापूरच्या उपमहापौराला पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले

टीम मंगळवेढा टाईम्स । एकाच फ्लॅटची अनेकांना विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सांगवी पोलिसांनी शुक्रवारी (ता. २९) रात्री सोलापूरहून ताब्यात घेऊन सांगवीत आणले. मात्र, शनिवारी (ता. 30) सांयकाळी ताप आणि शिंका आल्याने उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडले. शुक्रवारी मध्यरात्रीपासून पोलिसांकडून अटक केल्याचे सांगितले जात असताना शनिवारी सायंकाळी अचानक उपमहापौरांना सोडण्याची सांगवी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. (Solapur deputy mayor the police and released rajesh kale)

राजेश दिलीप काळे (वय ३०, रा. सोलापूर) असे समजपत्र देऊन सोडलेल्या भाजपच्या उपमहापौराचे नाव आहे. याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण (रा.कोंढवा) यांनी फिर्याद दिलेली आहे.

काळे हे सोलापूरचे उपमहापौर आहेत. फसवणुकीचा हा प्रकार 2005 ते 08 या कालावधीत घडला. काळे यांनी 2002 मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी काळे यांच्या विरोधात 4 मे 2019 ला सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार, सांगवी ठाण्यातील उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोलीस शिपाई दत्तात्रय नांगरे, संतोष डामसे यांचे पथक शुक्रवारी (दि. 29) विजापूर नाका पोलिस ठाण्यात गेले.

काळे यांना ताब्यात घेऊन हे पथक रात्री शहरात दाखल झाले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटक केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिवारी देखील सायंकाळी सातपर्यंत काळे यांना अटक केल्याचे सांगितले जात होते. मात्र, शनिवार सायंकाळी अचानक काळे यांना शिंका येऊ लागल्या. सध्या कोरोनाची साथ असल्याने काळे यांना उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे पोलिस अधिकारी सांगू लागले. ताप आणि शिंका असल्याने पोलिसांनी काळे यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, असे असताना उपमहापौर काळे यांना सोडण्याची सांगवी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे.

या फसवणूक प्रकरणात उपमहापौर काळे यांना ताब्यात घेतले होते. शनिवारी दिवसभर सांगवी पोलिस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, सायंकाळी अचानक त्यांना शिंका येऊ लागल्या. सध्या कोरोनाची साथ असल्याने काळे यांना उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन नातेवाइकांसमवेत सोडण्यात आले. आठ दिवसांनी त्यांना पुन्हा पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.– ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. या बाबतचे आदेश पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांना देण्यात आले आहेत.– रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Fearing for his life the deputy mayor  rajesh Kale of Solapur was questioned by the police and released

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
Shock । राज्यात पेट्रोल-डिझेल महागणार ; ठाकरे सरकारने वाढवला टॅक्स

Shock । राज्यात पेट्रोल-डिझेल महागणार ; ठाकरे सरकारने वाढवला टॅक्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? महिलांच्या खात्यात ‘या’ दिवशी ३००० रुपये जमा होण्याची शक्यता

June 29, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विठुरायाची भेट अपूर्णच राहिली; विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

June 29, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अर्थमंत्री असूनही का व्हायचं होतं कारखान्याचं चेअरमन? काय होती अजित पवारांची राजकीय खेळी? ‘या’ राजकीय खेळीमागचे कारण काय?

June 29, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळणार, भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार; ‘या’ तारखेपर्यंत असणार दिवसभर दर्शन उपलब्ध

June 29, 2025
मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढेकरांच्या सेवेसाठी आजपासून ‘विराज कन्ट्रक्शन’ तयार; आज उद्घाटन सोहळा

June 29, 2025
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

महाराष्ट्र हादरला! आषाढी वारी सुरू असताना महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या; आश्रमातच…

June 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा