टीम मंगळवेढा टाईम्स / खोमनाळ (प्रतिनिधी):
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी विधायक करण्याची संधी असते, याचा प्रत्यय खोमनाळ आणि हिवरगाव येथे आला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे ‘पाणीदार’ आमदार समाधान आवताडे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत उद्योजक सागर नागणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खोमनाळ आणि हिवरगाव हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

चिमुकल्यांच्या स्वप्नांना मिळाले बळ
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या ज्ञानाच्या वाटेला बळ मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी, या उदात्त हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. हातात नवीन शैक्षणिक साहित्य पडल्यानंतर चिमुकल्यांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आयोजकांसाठी खऱ्या अर्थाने समाधान देणारा ठरला.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या समाजोपयोगी उपक्रमाप्रसंगी युवानेते अविराज आवताडे, किरण घुले, चेअरमन सागर साळुंके, गणेश इंगळे, चेअरमन श्रीकांत फुकळे, उपसरपंच समाधान नागणे यांच्यासह दोन्ही शाळांतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्याप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा केवळ शुभेच्छांपुरती मर्यादित न ठेवता समाजहिताच्या कार्यातून व्यक्त केल्याने उद्योजक सागर नागणे आणि कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












